Ad will apear here
Next
शिशिर जोशीपुरा ‘प्राज इंडस्ट्रीज’चे नवे सीईओ
शिशिर जोशीपुरा
पुणे : ‘प्राज इंडस्ट्रीज्’ या जागतिक प्रक्रिया सोल्युशन्स कंपनीने शिशिर जोशीपुरा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदी नियुक्ती केली आहे. दोन एप्रिलपासून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.  

जोशीपुरा यांनी बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (बीआयटीएस) पिलानीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स मॅनेजमेंटची पदवी मिळवली आहे. प्राजमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी २००९ पासून एसकेएफ इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि राष्ट्रीय व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे.

या नियुक्तीबद्दल बोलताना प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष  प्रमोद चौधरी म्हणाले, ‘प्राजचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर यांचे मी मंडळातर्फे स्वागत करतो. विविध स्तरावर नेतृत्व करीत त्यांच्या ३५ वर्षांहून अधिक अनुभवासह ते आमच्या कंपनीत रुजू होत आहेत. उद्योग क्षेत्रातील विविध कल्पनांच्या पार्श्वभूमीसह स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेतील त्यांचा अभ्यास वृद्धीच्या पुढील टप्प्यात प्राजसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. नुतनीकरणक्षम इंधनाची मागणी घातांकी दराने वाढत आहे आणि इथेनॉल हे त्याच्या स्वच्छ आणि शाश्वत गुणधर्मांमुळे पहिली पसंती म्हणून उदयास येण्याची आम्ही अपेक्षा करतो.’

‘जगभरातील व्यवसायाचे ऊर्जा, आर्थिक आणि पर्यावरणाद्वारे शाश्वततेवर प्रबल लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे’, असे श्री. जोशीपुरा म्हणाले. ‘जागतिक नुतनीकरणक्षम ऊर्जा उद्योगाला गती मिळत आहे, जैव-ऊर्जेतील अंतर अभूतपूर्व संधी निर्माण करीत आहे. प्राज ही जैव ऊर्जा सोल्युशन्समधील (संयोगातील) जगभरातील एक प्रमुख सहभागी आहे, उलगडत जाणाऱ्या संधी पुढील टप्प्यात प्राजच्या वाढीसाठी कॅन्व्हास ठरत आहेत आणि मी या रोमहर्षक प्रवासात पुढाकार घेण्यास उत्सुक आहे.’

प्राज कंपनी ही पर्यावरण, ऊर्जा आणि कृषी प्रक्रियेतील अॅप्लिकेशन्समधील प्रमुख जागतिक उत्पादक आहे. ही कंपनी आधुनिक इथेनॉल तंत्रज्ञानातील आघाडीची विजेती आहे. प्राजचा स्वतःचा आणि भारतातील पहिला एकात्मिक आधुनिक प्रायोगिक जैव रिफायनरी डिसेंबर २०१६ पासून कार्यान्वित आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या भारतात अनेक आधुनिक जैव रिफायनरीजची उभारणी करीत असताना विविध प्रकल्पांसाठी प्राजची तंत्रज्ञान भागिदार म्हणून निवड झाली आहे. तसेच, विविध देशांतील प्राजच्या जैव रिफायनरी प्रकल्पांबाबत भारताबाहेरील अनेक ग्राहक चर्चा करीत आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZUDBN
Similar Posts
‘मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुखांची भूमिका आव्हानात्मक’ पुणे : ‘वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे  देशातील सर्व उद्योगजगताच्या कार्यपद्धतीमध्येही  मोठ्या प्रमाणात बदल  होत असून भविष्यात बदलाचा हा वेग आणखी वाढणार असल्याने अशा परिस्थितीत मनुष्यबळ व्यवस्थापकांची भूमिका आव्हानात्मक असणार आहे’, असे मत प्राज इंडस्ट्रिजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले
सेवावर्धिनी संस्थेला जनसेवा पुरस्कार प्रदान पुणे : जिल्ह्यातील नामांकित जनसेवा सहकारी बँकेच्या ४६वा वर्धापन दिन वानवडी येथील महात्मा ज्योतीराव फुले सभागृहात नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी सेवावर्धिनी संस्थेला प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘सेवावर्धिनी’तर्फे संस्थेचे कार्यवाह सोमदत्त
यंदाचा जनसेवा पुरस्कार सेवावर्धिनी संस्थेला पुणे : ‘पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्युल्ड बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची बँक असलेल्या जनसेवा सहकारी बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी, २४ ऑक्टोबर रोजी जनसेवा पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचा जनसेवा पुरस्कार देशभरातील सेवाभावी संस्थांना मदत करणाऱ्या ‘सेवावर्धिनी’ या संस्थेस देण्यात येणार
‘वॉटर ऑलिंपियाड’ स्पर्धेचे उद्घाटन पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, जाणीव युवा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉटर आलिंपियाड’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या ऑलिंपियाड प्रकल्पाचे उद्घाटन प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या हस्ते नुकतेच झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language